Monday, 21 February 2011

Malaysia

मलेशिया हा तेरा राज्ये आणि तीन संघराज्यीय प्रदेशांनी बनलेला आग्नेय आशियामधील एकदेश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. ३,२९,८४७ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा विस्तार असलेल्या या देशाचे दक्षिण चिनी समुद्रानेविभागलेले द्वीपकल्पीय मलेशिया आणि मलेशियन बोर्निओ हे प्रमुख दोन भाग आहेत. थायलंड,इंडोनेशिया, सिंगापूर, ब्रुनेई आणि फिलिपाइन्स या देशांना लागून मलेशियाच्या सीमा आहेत. हा देश विषुववृत्ताजवळ वसलेला असल्यामुळे येथील हवामान विषुववृत्तीय हवामानप्रकारानुसार आहे. मलेशियामध्ये वेस्टमिन्स्टर धर्तीवरील संसदीय लोकशाही असून सत्तेच्या सर्वोच्चपदी यांग दी-पेर्तुआन आगोंग (राजा) व कार्यकारी प्रमुखपदी पंतप्रधान असतात.
एकीकडे घनदाट जंगल आणि एकीकडे आधुनिक शहर , निसर्गाचा आणि शहरिकरानाचा उत्तम असा ताळमेळ बघायाला मिळतो , 
अतिशय उंच इमारती , सुंदर रस्ते , २४ तास जिवंत शहर इतकेच नव्हे तर  प्रेमळ पोलीस , शिस्त प्रिय माणसे  हे मलेशियाच वेगळे पण, एक आधुनिक शहर पण तितकेच संस्कृती प्रिय लोक.
मलेशियात एकट्या क्वाला लम्पूर मध्येच आणिक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
सर्वांनी जरूर जमलेतर एकदा तरी मलेशियाला जाऊन यावे. 

No comments:

Post a Comment